*३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या निम्मिताने*

*तंबाखूचा विळखा ! प्रगतीला धोका !!* *३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या निम्मिताने* *डॉ. अतुल ढगे, मनोविकारतज्ञ, रत्नागिरी यांनी त्यानिमित्ताने लिहिलेला लेख. आपण वाचा व इतरांना पाठवा*... आपण नेहमी पाहतो तंबाखू खाणाऱ्याचे किंवा बिडी सिगारेट द्वारे तंबाखूचे सेवन करणाऱ्याचे जगणे. तंबाखू मळताना किंवा बिडी सिगारेट ओढताना त्याचे स्टेन्स व वास कपड्यावरती पसरतात, दातांवरती दिसतात, आणि हवेतूनही पसरतात. आणि त्याचा प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण पुढची वेळ, पुढचा क्षण कधी येईल?, कधी तलफ होईल व कधी झुरका घेता येईल याच विचारात जातो. जर तुम्ही त्यापैकी असाल तर हा दिवस तुमच्यासाठी आहे. कारण तंबाखूमुळे फक्त तुमच्या आरोग्याला किंवा जीवाला धोका नाही तर तुमच्या वैयक्तिक , आर्थिक , कौटुंबिक, सामाजिक प्रगतीलाही धोका आहे. एवढंच नव्हे तर समाजाच्या व देशाच्या प्रगतीला पण धोका आहे... दरवर्ष...