Posts

Showing posts with the label Sexual Probelms and Sexologist

लैंगिक समस्या व अज्ञान

Image
लैंगिक समस्या व अज्ञान डॉ . अतुल   ढगे ,  मनोविकारतज्ञ , व्यसनमुक्तीतज्ञ व लैंगिक समस्या तज्ञ , माईंडकेअर हॉस्पिटल रत्नागिरी यांनी  लैंगिक आरोग्य दिनानिमित्त  ( ४ सप्टेंबर )  लिहिलेला लेख         लैंगिक वाचताच डोळे लेखाकडे नक्कीच वळले असतील आणि लेख वाचण्याची इच्छा नक्कीच झाली असेल , कारण हा विषयच असा आहे सर्वांच्या कुतूहलाचा पण खूप कमी वेळा चर्चा कलेला जाणारा आणि तोही एवढ्या उघडपणे ! कारण लैंगिकता म्हणजे लहानपणापासून “ श...श...श…याविषयी नसत बोलायचं ”, लहानपणापासून हेच आपल्याला शिकवलेलं असत. अगदी UKG/LKG मध्येच बॉडी पार्टस शिकवले जातात.   हात , पाय , नाक , डोळे सर्व अवयवांची ओळख पुस्तकात असते , पण लैंगिक अवयवांची ओळख ? मग एखाद्या लहान मुलाने कुतूहलापोटी विचारलं याला काय म्हणतात ?...... कि श.....श.....श.... !!! हे सर्व शिकवलं जात ते १२ वी मध्ये , तेही विज्ञानात. किती लोक १२ वी पर्यंत शिकतात , त्यातले किती जण अभ्यास करतात अन त्यातले कितीजण यावर विचार करतात देव जाने !    ...