मनाला लोकांपर्यंत नेणारा ‘शहाण्यांचा सायकिअॅट्रिस्ट’ हरवला !
*मनाला लोकांपर्यंत नेणारा ‘शहाण्यांचा सायकिअॅट्रिस्ट’ हरवला !* आज सकाळी डॉ. आनंद नाडकर्णी सरांच्या निधनाची बातमी ऐकली आणि मनात एक मोठी पोकळी निर्माण झाली. ते केवळ मानसोपचारतज्ज्ञ नव्हते; ते मनाला समाजाशी जोडणारे विचारवंत, शिक्षक, लेखक आणि चळवळ उभी करणारे संवेदनशील कार्यकर्ते होते. आमच्या पिढीतील अनेक मानसोपचारतज्ज्ञांसाठी ते मार्गदर्शक दीपस्तंभ होते. विशेषतः Community Psychiatry साठी. मानसिक आरोग्य क्लिनिकच्या चार भिंतीबाहेर कसे न्यावे, सामान्य माणसाला मनाची भाषा कशी समजावून सांगावी—हे आम्ही त्यांच्याकडून शिकलो. IPH च्या माध्यमातून त्यांनी साहित्य, संगीत, नाटक, कला आणि संवाद यांचा उपयोग करून मानसिक आरोग्य लोकाभिमुख केले. मानसिक आजारांबद्दल जागृती, उपचार आणि ताणतणावाशी सामना करण्यासाठी त्यांनी नावीन्यपूर्ण पद्धती या मला नेहमीच अचंबित करत. REBT सारखी किचकट वाटणारी उपचार थेरपी स्वतसाठी कशी वापरावी आणि रुग्णांसाठी त्याचा वापर कसा करावा व त्यांना ते कसे शिकवावे ही त्यांच्याकडून शिकायला मिळणे म्हणजे भाग्यच होते. त्यांनी मानसोपचाराला भीती, लाज आणि कलंकातून बाहेर काढून संवाद,...