Posts

Showing posts from February, 2026

गेमिंग अॅडिक्शन : स्क्रीनच्या आड लपलेला गंभीर मानसिक धोका

Image
  गेमिंग अॅडिक्शन : स्क्रीनच्या आड लपलेला गंभीर मानसिक धोका डॉ अतुल ढगे , मानसोपचारतज्ञ व लैंगिकसमस्यातज्ञ   गाझियाबादमध्ये घडलेली तीन अल्पवयीन बहिणींची आत्महत्येची घटना संपूर्ण देशाला हादरवणारी आहे. एका कोरियन ऑनलाइन मोबाईल गेमच्या अतीव व्यसनामुळे या मुली वास्तवापासून हळूहळू तुटत गेल्या. त्या स्वतःला भारतीय न समजता कोरियन समजू लागल्या , स्वतःची ओळख काल्पनिक पात्रांमध्ये पाहू लागल्या आणि शेवटी अतिशय टोकाचा निर्णय घेतला. कोविडनंतर वाढलेला स्क्रीन टाइम , मुलांवर लक्ष ठेवण्यातील मर्यादा आणि गेमिंग अॅडिक्शनचा धोका या घटनेत स्पष्टपणे समोर येतो. ही घटना केवळ एक बातमी नसून , आजच्या पालकांसाठी आणि समाजासाठी गंभीर इशारा आहे. गेमिंग अॅडिक्शन म्हणजे केवळ जास्त वेळ गेम खेळणे नाही. जेव्हा गेम खेळणे ही सवय न राहता गरज बनते , आणि गेम न खेळल्यास मूल अस्वस्थ , चिडचिडे , रागीट किंवा उदास होते , तेव्हा त्याला गेमिंग अॅडिक्शन म्हणता येते. अशा वेळी अभ्यास , झोप , जेवण , कुटुंब , मैत्री या सर्व गोष्टी दुय्यम ठरतात आणि गेमच आयुष्याचा केंद्रबिंदू बनतो. जागतिक आरोग्य संघटनेनेही या समस्येला “ Gamin...