Posts

Showing posts from 2026

मनाला लोकांपर्यंत नेणारा ‘शहाण्यांचा सायकिअ‍ॅट्रिस्ट’ हरवला !

Image
*मनाला लोकांपर्यंत नेणारा ‘शहाण्यांचा सायकिअ‍ॅट्रिस्ट’ हरवला !* आज सकाळी डॉ. आनंद नाडकर्णी सरांच्या निधनाची बातमी ऐकली आणि मनात एक मोठी पोकळी निर्माण झाली. ते केवळ मानसोपचारतज्ज्ञ नव्हते; ते मनाला समाजाशी जोडणारे विचारवंत, शिक्षक, लेखक आणि चळवळ उभी करणारे संवेदनशील कार्यकर्ते होते. आमच्या पिढीतील अनेक मानसोपचारतज्ज्ञांसाठी ते मार्गदर्शक दीपस्तंभ होते. विशेषतः Community Psychiatry साठी. मानसिक आरोग्य क्लिनिकच्या चार भिंतीबाहेर कसे न्यावे, सामान्य माणसाला मनाची भाषा कशी समजावून सांगावी—हे आम्ही त्यांच्याकडून शिकलो. IPH च्या माध्यमातून त्यांनी साहित्य, संगीत, नाटक, कला आणि संवाद यांचा उपयोग करून मानसिक आरोग्य लोकाभिमुख केले. मानसिक आजारांबद्दल जागृती, उपचार आणि ताणतणावाशी सामना करण्यासाठी त्यांनी नावीन्यपूर्ण पद्धती या मला नेहमीच अचंबित करत. REBT सारखी किचकट वाटणारी उपचार थेरपी स्वतसाठी कशी वापरावी आणि रुग्णांसाठी त्याचा वापर कसा करावा व त्यांना ते कसे शिकवावे ही त्यांच्याकडून शिकायला मिळणे म्हणजे भाग्यच होते.  त्यांनी मानसोपचाराला भीती, लाज आणि कलंकातून बाहेर काढून संवाद,...

गेमिंग अॅडिक्शन : स्क्रीनच्या आड लपलेला गंभीर मानसिक धोका

Image
  गेमिंग अॅडिक्शन : स्क्रीनच्या आड लपलेला गंभीर मानसिक धोका डॉ अतुल ढगे , मानसोपचारतज्ञ व लैंगिकसमस्यातज्ञ   गाझियाबादमध्ये घडलेली तीन अल्पवयीन बहिणींची आत्महत्येची घटना संपूर्ण देशाला हादरवणारी आहे. एका कोरियन ऑनलाइन मोबाईल गेमच्या अतीव व्यसनामुळे या मुली वास्तवापासून हळूहळू तुटत गेल्या. त्या स्वतःला भारतीय न समजता कोरियन समजू लागल्या , स्वतःची ओळख काल्पनिक पात्रांमध्ये पाहू लागल्या आणि शेवटी अतिशय टोकाचा निर्णय घेतला. कोविडनंतर वाढलेला स्क्रीन टाइम , मुलांवर लक्ष ठेवण्यातील मर्यादा आणि गेमिंग अॅडिक्शनचा धोका या घटनेत स्पष्टपणे समोर येतो. ही घटना केवळ एक बातमी नसून , आजच्या पालकांसाठी आणि समाजासाठी गंभीर इशारा आहे. गेमिंग अॅडिक्शन म्हणजे केवळ जास्त वेळ गेम खेळणे नाही. जेव्हा गेम खेळणे ही सवय न राहता गरज बनते , आणि गेम न खेळल्यास मूल अस्वस्थ , चिडचिडे , रागीट किंवा उदास होते , तेव्हा त्याला गेमिंग अॅडिक्शन म्हणता येते. अशा वेळी अभ्यास , झोप , जेवण , कुटुंब , मैत्री या सर्व गोष्टी दुय्यम ठरतात आणि गेमच आयुष्याचा केंद्रबिंदू बनतो. जागतिक आरोग्य संघटनेनेही या समस्येला “ Gamin...