कोरोनाचा काळ –बालक आणि पालक

कोरोनाचा काळ –बालक आणि पालक कोरोनाच्या साथीची परिस्थिती आणि लॉकडाउन परिस्थिती फार वेगळी झाली आहे. पहिल्या लाटेचा फटका ओसरतो न ओसरतो तोच दुसरी लाट आली आणि त्यासोबत लॉकडाउन पण आणि भीतीचे वातावरण पण. याचा परिणाम सर्वांवर होतोय आणि आपल्याला समजत आहे. पण एक गट असा आहे ज्यांच्यावर होणाऱ्या परिणामाची जाणीव किंबहुना आपणांस नाहीये आणि तो गट म्हणजे मुले. लॉकडाउनमुळे शाळा व कॉलेज बंद आहेत. अभ्यासाबाबत, परिक्षेबाबत सर्वत्र सावळा गोंधळ चालू आहे. मुले त्यामुळे गोंधळात आहेत. त्याचं रेग्युलर रुटीन बिघडलेले आहे आणि बाहेर जाता येत नाहीये, मित्रांना भेटता येत नाहीये. ऑनलाईन शिक्षणामुळे स्क्रीन टाईम वाढलेलाच आहे, त्यासोबत इतर ऑनलाईन गोष्टीकडे ते वळत असून इंटरनेट अँडिक्शन वाढत आहे. काहीजण आर्थिक परिस्थितीबाबत आईवडिलांची घालमेल पहात आहेत. काही जण आईवडिलांच्या क्वारंटाईनमुळे त्यांच्यापासून दूर आहेत, एकटे पडत आहेत. त्यासोबतच घरात सर्वांसोबत राहून नकारात्मक बातम्या त्यांच्या कानावर व डोळ्यावर पडून मानसिक तणावात आहेत. यासर्वांचा परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होत आ...