‘गोष्टी मनाच्या भाग 4 – आई मी होणार’

*आई होणे एवढे सोपे असते का? प्रसूती नंतर कुठल्या मानसिक आजाराला आईला तोंड द्यावे लागू शकते? का काही आई स्वतःच्या बाळाला इजा पोहचवतात *.. *डॉ अतुल ढगे , मेंदू-मनोविकारतज्ञ , लैंगिक समस्यातज्ञ , व्यसनमुक्ती तज्ञ व सर्टिफाईड सायकोथेरपीस्ट व कौन्सेलर. माईंड केअर हॉस्पिटल , रत्नागिरी* यांनी लिहिलेली ‘गोष्टी मनाच्या भाग 4 – आई मी होणार’ ..आपणही वाचा , दुसर्यांनाही पाठवा ‘गोष्टी मनाच्या भाग 4 – आई मी होणार’ “घरी एवढं आनंदाचे वातावरण आहे सगळे खुश आहेत. आम्हाला पहिली मुलगी हवी होती , मुलगी पण झाली . डिलिव्हरी व्यवस्थित झाली , मुलगी व्यवस्थित आहे . तिचे वजन व तब्येत व्यवस्थित आहे . मलाही काही त्रास नाही , कसले टेन्शन नाही ; तरी पण मला खुश वाटतच नाही. सतत उदास वाटत राहते. निराश वाटत राहते. काही करावेसे वाटत नाही. कशात मन लागत नाही. झोपायला गेले तरी लवकर झोप लागत नाही , सकाळी ३-४ वाजताच जाग येते आणि परत जागेच राहावे लागते". निता मला सांगत होती. निता , २७ वय वर्ष , B. Com पूर्ण करून ऑफिस मध्ये जॉब करत होती. अडीच वर्षापूर्वी तिचे लग्नही झाले आ...