गन्जेरी भाय
गंजेरी भाय डॉ अतुल ढगे , माईंड केअर हॉस्पिटल , रत्नागिरी " दिनभर कूछ भी नही करता, बस तीन-चार बार चरस गांजा लेता है और लेटा रहता है" अरमान ची आई राग आणि नाईलाजाच्या स्वरात बोलत म्हणाली. अरमान (नाव बदललेले) अवघ्या वीस वर्षाचा मिसरूड फुटायला लागलेला तरुण , पण मागील 4 वर्षपासून तो चरस गांजा मध्ये आकंठ बुडालेला होता. १० वी नंतरच त्याला मोहल्यातल्या मुलांसोबत राहून चरस गांजा चे व्यसन लागले होते. नंतर तो दिवसभर मुलांमध्येच राहायला लागला. वडील बाहेरच्या देशात बहरिनला नोकरीला होते त्यामुळे त्याच्यावर कोणाचा वचक नव्हता. त्यामुळेच पैशाचाही तसा काही प्रॉब्लेम नव्हता. सुरुवातीला तो नशेसाठी खोटे काही तरी सांगून आईकडून मागून पैसे घेत होता पण परत परत तो आईला दम देऊन , स्वतःला काहीतरी करीन असे सांगून किंवा चोरून पैसे घ्यायला लागला होता. वडिलांचा स्वभाव स्ट्रिक्ट असल्यामुळे वडिलांना सांगायचे कसे म्हणून आईने वडिलांच्या कानावर ही गोष्ट घातली नव्हती. आता मात्र तो पूर्ण व्यसनाधीन झाला होता. एक दिवस तो काहीही बडबड करायला लागला, विचित्र वागू लागला म्हणून शेजाऱ्य...