गन्जेरी भाय
गंजेरी भाय
डॉ अतुल ढगे, माईंड केअर हॉस्पिटल, रत्नागिरी
"दिनभर
कूछ भी नही करता, बस तीन-चार बार चरस गांजा लेता है और लेटा रहता है" अरमान
ची आई राग आणि नाईलाजाच्या स्वरात बोलत म्हणाली.
अरमान (नाव बदललेले) अवघ्या वीस वर्षाचा मिसरूड फुटायला लागलेला तरुण, पण मागील 4 वर्षपासून तो चरस गांजा मध्ये आकंठ बुडालेला होता. १० वी नंतरच त्याला मोहल्यातल्या मुलांसोबत राहून चरस गांजा चे व्यसन लागले होते. नंतर तो दिवसभर मुलांमध्येच राहायला लागला. वडील बाहेरच्या देशात बहरिनला नोकरीला होते त्यामुळे त्याच्यावर कोणाचा वचक नव्हता. त्यामुळेच पैशाचाही तसा काही प्रॉब्लेम नव्हता. सुरुवातीला तो नशेसाठी खोटे काही तरी सांगून आईकडून मागून पैसे घेत होता पण परत परत तो आईला दम देऊन, स्वतःला काहीतरी करीन असे सांगून किंवा चोरून पैसे घ्यायला लागला होता. वडिलांचा स्वभाव स्ट्रिक्ट असल्यामुळे वडिलांना सांगायचे कसे म्हणून आईने वडिलांच्या कानावर ही गोष्ट घातली नव्हती. आता मात्र तो पूर्ण व्यसनाधीन झाला होता. एक दिवस तो काहीही बडबड करायला लागला, विचित्र वागू लागला म्हणून शेजाऱ्याच्या सांगण्यावरून ते त्याला माझ्याकडे घेऊन आले होते. पढाई बंद किया है, कमसे कम कुछ छोटा काम कर बोलती हुँ, लगता है कुछ काम करेगा तो दिमाग बिजी रहेगा. लेकिन कुछ सुनता नहीं है. दिनभर कूछ भी नही करता, बस तीन चार बार चरस गांजा लेता है और लेटा रहता है" आई मला माहिती देताना सांगत होती.
आज कित्येक अरमान असे गंजेरी होऊन फिरतायत आणि त्यांची आई वडील हतबल झाले आहेत. होय गंजेरी. शास्त्रीय भाषेत याला ‘अमोटीवेशनल सिंड्रोम’ म्हणतात. यामध्ये रुग्णाला काहीही करण्यात काहीही रस नसतो. ऐन उमेदीच्या काळात या तरुणांची ही परिस्थिती होते आणि त्याला कारण म्हणजे हा चरस, गांजा.
चरस गांजा भांग ही कॅनाबिस नावाच्या झाडापासून तयार केले जाते. दिसायला ते
तंबाखू सारखे दिसते. शक्यतो
वापरनारे ते स्मोक करण्यासाठी वापरतात. काही वेळा ते पिले जाते. सुरूवातीला हे
घेतल्यानंतर घेणाऱ्याला तात्पुरते आरामदायक वाटते किंवा खुप चांगले वाटते. सर्व
चेतना संस्था अधिक प्रखरपणे काम करतात. त्यामुळे वापरणार्यांना दृष्टी, वास, चव आणि ऐकण्याची भावना अधिक स्पष्ट
अनुभवता येते. म्हणजेच साध्या भाषेत दुनिया रंगीन लगने लगती है परंतु ते तात्पुरते
आणि नशेच्या अंमलाखाली असेपर्यंतच. त्याचे दुष्परिणाम खुपच घातक असतात. त्यामुळे
भूक आणि नाडीचा दर वाढतो. शारीरिक आणि बौद्धिक कामे पार पाडण्यात जसे की कार
चालवणे आणि तार्किक विचार करणे यात अडथळा येतो. जास्त डोस मध्ये ते जीवावर ही बेतू
शकते. त्यांची विचारसरणी मंद आणि गोंधळलेली बनते. त्यामुळे चिंता, घाबरणे
आणि अगदी स्किझोफ्रेनिया सारखे मनोविकार देखील होऊ शकतात. तसेच याला गेट वे ड्रग
पान म्हटले जाते कारण इथूनच त्या तरुणाचा अधिक धोकादायक ड्रग घेण्याकडे वाटचाल
सुरू होऊ शकते.
MBBS, DPM, MD(AM)
माईंडकेअर हॉस्पिटल फॉर मेंटल अँड सेक्शुअल हेल्थ
9503421124
Comments