*“मैदानावर हसत होती… पण मनात रोज लढत होती” – जेमिमा रॉड्रिग्सची खरी गोष्ट*
* “ मैदानावर हसत होती… पण मनात रोज लढत होती” – जेमिमा रॉड्रिग्सची खरी गोष्ट* *डॉ अतुल ढगे, मनोविकारतज्ञ व लैंगिक समस्या तज्ञ* क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्सने काल वर्ल्ड कप सेमी फायनल मध्ये 127 नाबाद अशी जबरदस्त खेळी केली, आणि भारताला अशक्य अशा सामन्यात विजय मिळवून दिला व भारताने वर्ल्ड कप फायनल मध्ये प्रवेश केला. *तिने सामन्यानंतर सगळ्यासमोर सांगितलं , “ मी मागच्या काळात जवळजवळ रोज रडायचे… खूप चिंतेमध्ये असायची , स्वतःवरचा विश्वास ढासळला होता.” ही गोष्ट फक्त तिची नाही — ही आपल्यापैकी बऱ्याच जणांची आहे , फक्त आपण ती उघड बोलत नाही.* मानसोपचार तज्ञ म्हणून मला तिची ही मुलाखत विशेष भावली. कालच्या तिच्या मुलाखतीतून बऱ्याच गोष्टी सर्वांनी शिकण्यासारख्या वाटल्या. त्यासाठीच हा विशेष लेख प्रपंच व त्याविषयी काही ठळक मुद्दे मांडण्याचा प्रयत्न. * 1. मनावरचं दडपण — सगळ्यांनाच असतं* जगात कुणीही परफेक्ट नसतं. पण जेव्हा आपण स्वतःकडून 100 टक्के अपेक्षा ठेवतो आणि चुकलो की स्वतःलाच दोष देतो , तेव्हा मन थकून जातं. खेळाडू असो , विद्यार्थी असो , ...