युद्धजन्य परिस्थिती आणि मानसिक आरोग्य - डॉ अतुल ढगे, मानसोपचारतज्ञ व लैंगिकसमस्यातज्ञ

युद्धजन्य परिस्थिती आणि मानसिक आरोग्य - डॉ अतुल ढगे, मानसोपचारतज्ञ व लैंगिकसमस्यातज्ञ सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढता तणाव आणि युद्धसदृश वातावरण अनेक नागरिकांच्या मनात अस्वस्थता निर्माण करत आहे. टीव्ही वृत्तवाहिन्यांवर सतत युद्धाच्या शक्यतेबद्दल चर्चासत्रं, तज्ज्ञांचे अंदाज आणि काही वेळा अतिरंजित मथळ्यांनी भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत. त्यातच सोशल मीडियावरून सतत येणाऱ्या अफवा, भावनिक आवाहने, देशभक्तीचा अतिरेक, आणि काही वेळा द्वेषयुक्त पोस्ट्स या गोष्टी लोकांच्या मानसिक स्वास्थ्यावर अधिकच दडपण टाकत आहेत. या सगळ्याचा सर्वसामान्य नागरिकांवर खोल परिणाम होत आहे. विशेषतः महिला, वयोवृद्ध, लहान मुले, मानसिक आजाराने त्रस्त व्यक्ती आणि आधीच तणावाखाली असणारे कर्मचारी वर्ग यांच्यावर अशा घटनांचा मानसिक आघात अधिक तीव्र होतो. सततच्या असुरक्षिततेच्या भावनेमुळे चिंता वाढते, झोपेचा त्रास होतो, चिडचिड वाढते, आणि अनेकांना भविष्याची भीती वाटू लागते. काही लोक घराबाहेर निघायला घाबरतात, तर काहीजण वारंवार मोबाईलवर अपडेट्स पा...