*३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या निम्मिताने*
*तंबाखूचा विळखा ! प्रगतीला धोका !!*
*३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या निम्मिताने*
*डॉ. अतुल ढगे, मनोविकारतज्ञ, रत्नागिरी यांनी त्यानिमित्ताने लिहिलेला लेख. आपण वाचा व इतरांना पाठवा*...

आपण नेहमी पाहतो तंबाखू खाणाऱ्याचे किंवा बिडी सिगारेट द्वारे तंबाखूचे सेवन करणाऱ्याचे जगणे. तंबाखू मळताना किंवा बिडी सिगारेट ओढताना त्याचे स्टेन्स व वास कपड्यावरती पसरतात, दातांवरती दिसतात, आणि हवेतूनही पसरतात. आणि त्याचा प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण पुढची वेळ, पुढचा क्षण कधी येईल?, कधी तलफ होईल व कधी झुरका घेता येईल याच विचारात जातो. जर तुम्ही त्यापैकी असाल तर हा दिवस तुमच्यासाठी आहे. कारण तंबाखूमुळे फक्त तुमच्या आरोग्याला किंवा जीवाला धोका नाही तर तुमच्या वैयक्तिक , आर्थिक , कौटुंबिक, सामाजिक प्रगतीलाही धोका आहे. एवढंच नव्हे तर समाजाच्या व देशाच्या प्रगतीला पण धोका आहे...
दरवर्षी ३१ मे हा दिवस १९८८ पासून जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. तंबाखूच्या व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे व वापरामुळे होणाऱ्या विविध वाईट परिणामांविषयी जन-जागृती करणे व तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थपासून लोकांना दूर करणे व त्यासाठी लोकांना प्रवृत्त करणे हा त्यामागचा हेतू होय.@ डाॅ अतुल ढगे
दर वर्षी तंबाखूमुळे जगभरामध्ये ७० लाख लोकांचा मृत्यू होतो. २०३० पर्यंत हाच आकडा ८० लाखापर्यंत जाईल असेल निदर्शनास आले आहे. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ वापरणाऱ्या लोकांपैकी ५० % लोक तंबाखूमुळे आज न उद्या मृत्युमुखी पडतात.
तंबाखूचे आयुष्यावर व आरोग्यावर दूरगामी व घातक परिणाम होतात. तोंडाचे, फुफुसाचे कैन्सर ( कर्करोग ) व त्यामुळे होणारा मृत्यू हा सर्वात मोठा परिणाम. त्यासोबतच हृदयाचे व रक्तवाहिन्यांचे विकार , श्वसनसंस्थेचे विकार जसे कि अस्थमा, ब्रॉन्कायटिस इत्यादी आजार, मेंदूला रक्ताचा अपूर्ण पुरवठा व त्यामुळे येणार पक्षाघात किंवा इतर आजार हे काही महत्वाचे आरोग्यावर होणारे परिणाम आहेत.

तंबाखूच्या व तंबाखूजन्य पदार्थाच्या वापरामुळे त्या व्यक्तीचे व कुटुंबाचे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असते. तंबाखू वापरण्यावर अमाप पैसे खर्च तर होताच परंतु त्यासोबतच त्याचा कामावरतीही परिणाम होतो व त्याची उत्पादन क्षमता कमी होऊन आर्थिक वाढ खुंटते. परिणामी गरिबी वाढते, चांगले शिक्षण, चांगले आरोग्य, तसेच चांगले अन्न व चांगल्या सुविधा यापासून ती व्यक्ती व त्याचे कुटुम्बीय वंचित राहतात व त्या व्यक्तीचा व इतर कुटुंबीयांचा वैयक्तिक व आर्थिक स्तर ढासळतो. देशाचा बराच पैसा या तंबाखूमुळे होणाऱ्या आजाराच्या व आरोग्याच्या समस्येवरती खर्च होतो, उत्पादन क्षमता कमी होऊन दरडोई उत्पन्न कमी होते.
यासोबतच तंबाखूच्या वापरामुळे वातावरणावरतीही वाईट परिणाम होतात. तंबाखूचा धूर व केमिकल्स हवेच्या प्रदूषणास कारणीभूत ठरते. तसेच तंबाखूच्या शेती मध्ये हि तिथे वापरले जाणारे कीटकनाशके तणनाशके यामुळे मातीचे, पाण्याचे व हवेचे प्रदूषण होते.
*काय करता येऊ शकते*
यासाठी सरकारी व वैयक्तिक दोन्ही स्तरावरती प्रयत्न होणे गरजेचे आहे. वैयक्तिक स्तरावरती जे लोक वापरत नाहीत त्यांनी आयुष्यात कधीही तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ वापरणार नाही अशी शपध घेऊन त्याप्रमाणे व्यवहार करणे गरजेचे आहे. जे लोक वापरतात त्यांनी सोडायचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. गरज पडली तर त्यासाठी मनोविकारतज्ज्ञाची मदत घ्यायला हवी. जर मनोविकारतज्ज्ञाची मदत घेतली तर निम्मे लोक तंबाखू व बिडी सिगारेट वापरणे बंद करू शकतात असे निदर्शनास आले आहे. जर स्वतःहून सोडू शकत नसेल तर कौंसेलिंग व औषधउपचाराच्या साहाय्याने चांगले होऊ शकतात.@ डाॅ अतुल ढगे

सरकारी स्तरावरती विविध नियम बनवले जाणे, त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे व त्या विषयी सर्वसामान्य लोकांना जन जागृत करणे व शिक्षित करणे गरजेचे आहे. तसेच तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीवरती मोठा कर (टॅक्स) लावणे गरजेचे आहे.
*सिगारेट अँड ऑदर टोबॅको प्रॉडक्ट्स ऍक्ट ( COTPA )-२००३*
१. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे गुन्हा आहे. अशा ठिकाणी तेथील मालकांनी "येथे धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे" असा बोर्ड लावणे बंधनकारक आहे.
२. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची जाहिरात प्रसारित करणे, प्रसिद्ध करणे तसेच अशा जाहिरातीत काम करणे गुन्हा आहे.
३. १८ वर्षाखालील व्यक्तीस किंवा शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटर च्या आवारात तंबाखूजन्य पदार्थ विकणे गुन्हा आहे.
४. तंबाखूजन्य पदार्थ ज्या मध्ये विकला जाईल त्यावरती मोठ्या आकारात पिक्चर वॉर्निंग असणे व लिखित वॉर्निंग असणे बंधनकारक आहे.

२००३ कॉटपा च्या कायद्यातील हे काही महत्वाचे नियम असले तरी त्याची काटेकोर अंमलबाजवणी होणे व त्याबद्धल लोकांना शिक्षित करणे हे खूप महत्वाचे आहे.
*तंबाखू किंवा सिगारेट सोडायची आहे, काय कराल ?*
१. सर्वप्रथम तंबाखू सिगारेट मुले आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम निर्मण होतोय हे मान्य करा.
२. त्यामुळे होणारे शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक परिणाम लिहून काढा.
३. बंद केल्यास आपल्या आयुष्यात काय चांगले बदल घडून येतील ते लिहून काढा.
४. बंद करण्याचा दिवस ठरवा.
५. त्यासाठी कुटुंबीयांची किंवा मनोविकार तज्ज्ञाची मदत घ्या.
६ तल्लफ निर्माण करणारे ट्रिगर्स ओळखा व दूर करा.
७. हळू हळू प्रमाण कमी करत आणा व ठरवलेल्या तारखेला पूर्णपणे बंद करा.
८.ठरवलेल्या प्रमाणे कितीही तल्लफ झाली तरी घेणे टाळा, ट्रिगर्स टाळा.
९. प्रत्येक दिवशी त्यादिवशी तंबाखू / सिगारेट नाही वापरल्या बद्धल स्वतःला शाबासकी द्या.@ डाॅ अतुल ढगे

चांगले आरोग्य निवडायचे कि तंबाखू हे आपल्या हातात आहे. आजपासूनच तंबाखू टाळा व स्वतःच्या प्रगतीमधील अडथळा दूर करा व तसेच त्यासाठी इतरांना पण मदत करा.
*डाॅ अतुल ढगे*
*मनोविकारतज्ञ, व्यसनमुक्तीतज्ञ व लैंगिकसमस्यातज्ञ*
*माईंड केअर हॉस्पीटल फाॅर मेंटल अॅन्ड सेक्शुअल हेल्थ, रत्नागिरी*
*9503421124*
www.mindcareonline.com

Comments