नावात काय आहे
नावात काय आहे ? डॉ अतुल ढगे , माईंड केअर हॉस्पिटल , रत्नागिरी " नाही सर मी दारू नाही पित. मी फक्त विस्की पितो." रमेश सांगत होता. रमेश 28 वर्षाचा होता. पूर्वी कधीतरी दारू घेणाऱ्या रमेशचे दारूचे प्रमाण आठवड्यातून ३-४ वेळा झाले होते. त्यामध्ये त्याचे कामाकडे , कुटुंबाकडे , घराकडे मुलीकडचे लक्ष कमी होतेय असे वाटल्यामुळे तिची पत्नी तिला बळेच घेऊन आली होती. तेव्हा रमेश सांगत होता , " नाही सर , मी दारू पित नाही. मी फक्त विस्की पितो." रमेश सारखे अनेक रुग्ण किंवा व्यक्ती मी पाहतो, ज्या आपल्या दारु पिण्याचं समर्थन करण्यासाठी किंवा काहीवेळा गैरसमजुतीतून ( ?) असे सांगत असतात. ताडी माडी पिणारे ही काहीवेळा मी पाहिले आहेत जे म्हणतात की मी ताडी पितो , दारू नाही. देशी दारू म्हणजेच दारू असा कदाचित त्यांचा गैरसमज असावा किंवा भासवायचा असावा. जेव्हा दारू पिण्याचे व्यक्ती अशा प्रकारे समर्थन करतो त्याला डिफेन्स मेकॅनिजम असे म्हणतात. त्यात सर्वात महत्त्वाची डिनायल , रॅश...