*समर्थ म्हणे आता करा ऍडमिशन*
समर्थ म्हणे आता करा ऍडमिशन
डॉ अतुल ढगे, माईंड केअर हॉस्पिटल, रत्नागिरी
“आमच्या नातेवाईकामध्येही अशी घटना घडली होती. पण पेशंटला अॅडमिशन ची गरज आहे हे स्वतः किंवा नातेवाईकाने कसे ओळखायचे” माझ्या एका व्यक्तीने मला व्हाटसअप्प वर मेसेज करून विचारले. मागील महिन्यातील लोकमत मध्ये माझा लेख अनेकांनी वाचला. त्या लेखाला व्हाट्सअप वरती बऱ्याच प्रतिक्रिया आल्या. काहींनी आपल्या आजूबाजूला अशा घटना घडल्या सांगितल्या. काही सायकॅस्ट्रीस्टनी अशी परिस्थिती आपल्याला बऱ्याच वेळी अनुभवायला मिळाले असे सांगितले. काहीजणांनी कौतुका पोटी विचारले की मानसिक आजारांमध्ये एडमिशन केव्हा करायला पाहिजे? त्यासाठी हा खटाटोप. अशा काही प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी हा लेख.
मानसिक आजार ओळखता येणे खरच खूप महत्त्वाचं असतं कारण मानसिक आजारांमध्ये सुरुवातीच्या स्टेजला जर तो आजार ओळखता आला व उपचार करता आले तर शक्यतो ॲडमिशनची गरज पडत नाही किंवा ट्रीटमेंट ही वेळेत आणि लवकरात लवकर पूर्ण करता येऊ शकते. परंतु बऱ्याच वेळी लवकरात लवकर उपचार न मिळाल्यामुळे, व तो आजारच न ओळखता आल्यामुळे आजार वाढत जातो. आणि मग मात्र ज्यावेळी हा आजार टोकाचा होतो त्यावेळी रुग्णाला ऍडमिशन ची गरज पडू शकते. जे रुग्ण स्वतःसाठी धोकादायक कृत्य करतात, ज्यांच्या मनात आत्महत्येचा विचार चालू असतो, जे आत्महत्येचा प्लॅन करत असतात किंवा आत्महत्येचा प्रयत्न करतात तसेच स्वतःला काहीतरी इजा पोहोचवणे, स्वतःला मारून घेणे किंवा भिंती वरती स्वतःचे डोकं आपटणे असे स्वतःला इजा करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत, त्यांना एडमिशन ची गरज असते. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतरांना इजा करणारे लोक. काही मानसिक आजार असे आहेत ज्यांना मुख्यता वेडसरपणात गणले जाते. त्यामध्ये रुग्णांना कोणीतरी आपल्या विरुद्ध आहे, कोणतरी आपल्याला मारणार आहे काहीतरी करणार नाही असा संशय असतो आणि त्या संशयापोटी ते समोरच्या व्यक्तीला मारण्याचा प्रयत्न करतात. ती आपल्याला मारणार आहे, त्या अगोदर किंवा आपल्या विषयी वाईट बोलते त्यामुळे ती व्यक्ती त्या समोरच्या व्यक्तीला मारण्याचा किंवा इजा करण्याचा प्रयत्न करते. बऱ्याचवेळी घरच्या व्यक्ती त्यांच्या मनात आलेल्या विचाराला किंवा त्याच्या वागण्याला विरोध करत असते. अशा वेळी रुग्ण आक्रमक किंवा हिंसक होऊ शकतो, समोरच्या व्यक्तीला इजा करू शकतो.
तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे. स्वतःची बिलकुल ही काळजी न करणे, स्वतःची स्वच्छता न बाळगणे. पंधरा-पंधरा दिवस अंघोळ न करणे, कपडे न बदलणे, दाढी वाढवणे आणि खाण्याच्या गोष्टी टाळणे किंवा न खाणे. अशावेळी ही टोकाची स्वतःची काळजी न करण्याचा त्रास जेव्हा होतो त्यावेळी रुग्णाला न खाल्ल्यामुळे किंवा अस्वच्छतेमुळे काही तरी शारीरिक आजार होण्याची शक्यता होऊ शकते त्याच्या जिवाला धोका होऊ शकतो त्यामुळे अशा व्यक्तीला ॲडमिट करणे गरजेचे असते.
चौथी गोष्ट म्हणजे ज्यावेळी व्यक्ती हिंसक होऊन वस्तूंची तोडफोड करते. टीव्ही फोडणे, मोबाईल फोडणे, गाड्या फोडणे अशा प्रकारे महागड्या वस्तू किंवा मोठ्या वस्तूंना जर ते धोका करत असल्यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकत असेल तर अशा वेळी रुग्णाला ॲडमिट करायची गरज पडू शकते. जर रुग्ण औषध उपचार घेण्यास तयार नसेल गोळ्या घेत नसेल तर त्याचा आजार कमी होण्याची शक्यता खूप कमी असते त्यामुळे अशा वेळी त्यास ऍडमिट करून इंजेक्शन देणे किंवा इतर काही ट्रीटमेंट करण्यासाठी त्याला ऍडमिट करण्याची गरज पडू शकते. जेणेकरून डॉक्टरांच्या सिस्टरांच्या देखरेखीखाली त्याला व्यवस्थित गोळ्या दिल्या जाऊ शकतात. त्याही तो घेत नसेल तर त्याला इंजेक्शन देता येऊ शकते. आणि शेवटचे म्हणजे काही रुग्णांना फक्त औषध घेऊन किंवा इंजेक्शन घेऊन बरे वाटत नाही त्यांचा आजार कमी होत नाही अशावेळी अशा रूग्णांना लवकरात लवकर फरक पडण्यासाठी किव्हा औषधांचा फरक येईपर्यंत बरे होण्यासाठी किंवा औषधांचा इफेक्ट व्हावा म्हणून ऍडमिट करून सुरुवातीला उपचार द्यावे लागू शकतात किंवा ECT (शॉक) सारख्या ट्रीटमेंट सुरवातीला द्यावी लागते. अशावेळी एडमिशन ची गरज पडू शकते.
तसेच जे लोक जास्त दारू पितात, जास्त प्रमाणात दारू पितात, दिवसातून तीन-चार वेळा दारू पितात आणि त्यातल्या त्यात ही देशी दारू सारखी हानिकारक किंवा स्ट्रॉंग दारू घेतात अशा लोकांना ॲडमिशनची गरज असते किंवा किंबहुना अशा व्यक्तींना ऍडमिट करून उपचार करणे जास्त फायद्याचे असते. दारू कमी केल्यानंतर सुरवातीच्या काही दिवसांत ज्या वेळी शरीरातील रक्तातील दारू हळूहळू कमी होत असते त्या वेळी रुग्णाला वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे दिसून येतात. थरथर कापणे, झोप न लागणे भास होणे अशा व्यक्ती डीलिरीयमध्ये (संभ्रमावस्थेत) जाऊ शकतात. आपण कोण आहोत कुठे आहोत काय करत आहोत अशा गोष्टी सुद्धा त्या व्यक्तीला कळत नाहीत अशा कंडीशन मध्ये रुग्णाचा स्वतःचा ताबा जाऊन स्वतःला किंवा इतरांना रुग्ण इजा करू शकतो. तसेच फिट येण्याची शक्यता ही असते. त्यामुळे शक्यतो अशा व्यक्तीला दारू सोडवण्यासाठी सुरुवातीच्या काळात ऍडमिट करणे खूप महत्वाचे. तसेच दारू पिणारी जी व्यक्ती दारू सोडण्यास तयार नसते किंवा ड्रग अॅडिक्शन (विविध पदार्थांचे व्यसन) असणाऱ्या व्यक्तीना दारू सोडण्यासाठी किंवा व्यसन सोडवण्यासाठी मोठ्या कालावधीसाठी ऍडमिट करून घ्यावे लागू शकते ज्याने करून ती व्यक्ती त्या बाहेर जाऊ शकणार नाही किंवा तलप झाल्यानंतर त्या गोष्टीकडे जाऊ शकणार नाही त्या गोष्टीची सेवन पण करू शकणार नाही.
वरील पैकी कुठलीही परिस्थिती असेल तर अॅडमिशन करून उपचार केलेस उपचार लवकरात लवकर व व्यवस्थित पूर्ण होऊन रुग्ण पूर्णपणे बरा होण्यास मदत होऊ शकते.
MBBS, DPM, MD(AM)
मनोविकारतज्ञ, लैंगिकसमस्यातज्ञ व व्यसनमुक्तीतज्ञ
माईंडकेअर हॉस्पिटल फॉर मेंटल अँड सेक्शुअल हेल्थ
9503421124
#mentalillness, #mentalhealth, #dratuldhage, #psychiatrist, #sexologist, #sexualproblems, #deaddiction, #mindcare, #letstalkaboutsex, #sexualproblems
Comments