ढ...ढ...ढ...मुलाचा - विशीष्ट अध्ययन क्षमता
ढ..
ढ.. ढ मुलाचा – विशिष्ठ अध्ययन अक्षमता
डॉ अतुल ढगे, माईंड केअर हॉस्पिटल, रत्नागिरी
अनेक मुलांना अभ्यास करताना काही विशिष्ठ अडचणी येतात याला शैक्षणिक
अक्षमता असे म्हणतात. या मुलांचा बुध्यांक नॉर्मल किंवा त्यापेक्षाही चांगला असतो.
परंतु अभ्यासात त्यांना येणाऱ्या समस्येमुळे व पालकांना किंवा शिक्षकांना या
आजाराबद्दल माहिती नसल्यामुळे या मुलांवर 'ढ' किंवा 'मठ्ठ' म्हणून शिक्का बसतो. सर्वसाधारणपणे शाळेत जाणाऱ्या सुमारे पाच
टक्के मुलांमध्ये अध्ययन अक्षमता आढळून येते. विशिष्ट शैक्षणिक अक्षमता ही बऱ्याच
मुलांमध्ये आढळून येणारी समस्या आहे. परंतु ती मतिमंदत्वापेक्षा वेगळी आहे.
विशिष्ट प्रकारची शैक्षणिक मदत (special education) मिळाल्यास ही मुले शिक्षणात इतर मुलांसारखी प्रगती करू शकतात.
हा आजार का होतो याचे नेमके कारण अजून माहित
नाही. मेंदूच्या नेटवर्क मध्ये असे काही
बिघाड येतात की त्या मेंदूला माहितीवर प्रक्रिया करण्यात अडचणी येतात. आनुवंशिकता, गर्भारपणातील गुंतागुंत, पहिल्या दोन वर्षात मेंदूच्या वाढीदरम्यान
येणाऱ्या समस्या यामुळे हे होऊ शकते.
यामध्ये मुलांना तीन प्रकारच्या समस्या येऊ
शकतात.
1.
वाचन्यामध्ये येणाऱ्या समस्या (Dyslexia)- मुलांना वाचताना शब्द समजत नाहीत. त्याचे आकलन होत नाही. आपण chinese किंवा इतर भाषा वाचताना ज्याप्रकारे आपला
मेंदू ती माहिती process करेल त्याप्रमाणे होते. तो शब्द, अक्षरे किंवा ओळी गाळून वाचतो किंवा चुकीचे काहीतरी वाचतो.
2.
लिहिण्यामध्ये येणाऱ्या समस्या (Dysgraphia)- मुलांना लिहताना विशिष्ट अडचणी येतात. ते शब्द उलटे लिहतात.
(मराठीमध्ये व, ड, र, ल किंवा इंग्रजीमध्ये b ला d किंवा M ला W, P ला q ). लिहिताना काही अक्षरे किंवा शब्द गाळले
जातात किंवा वेगळीच अक्षरे लिहिली जातात. त्यांचे हस्ताक्षर समजायलाही खूप अवघड
जाते.
3.
गणिती प्रक्रियांमध्ये येणाऱ्या समस्या (Dyscalculia)- गणिती प्रक्रिया किंवा चिन्हे समजायला त्यांना अवघड जाते. अधिक
असल्यास ते वजा करतात किंवा गुणाकार असल्यास भागाकार करतात. पाढे म्हणणे, लिहिणे त्यांना जमत नाही.
शाब्दिक असलेल्या प्रश्नातून गणिती प्रक्रिया करणे व उत्तर काढणे त्यांना अवघड
जाते.
वाचण्यामध्ये येणाऱ्या समस्या ही सर्वात जास्त प्रमाणात आढळते. बऱ्याच मुलांमध्ये या तीन्ही
गोष्टी एकत्र आढळू शकतात. बऱ्याच वेळी अशी मुले आपल्याला धांदरट पण वाटू शकतात. त्यांना
डावे-उजवे कळायला अवघड जाते. स्वतःच्या बूटाचा लेस बांधणे, शर्टची बटणे व्यवस्थित लावणे या
गोष्टींमध्ये अडथळा येतो.
यामुळे त्याचा त्या मुलांवर मोठा परिणाम
होतो. मुलांना अभ्यास करताना त्रास होतो, अवघड वाटतो. त्यामुळे त्यांना अभ्यासात, शाळेत जाण्यात रूची वाटत नाही. पालकांना
किंवा शिक्षकांना तो अभ्यास करत नाही, त्याला काही येत नाही, तो अभ्यास करताना पुरेसा प्रयत्न करत नाही
असे वाटते. बऱ्याच
वेळी तो शाळेत खोड्या काढणे किंवा इतर पद्धतीने त्रास देणे असे गैरवर्तन करू शकतो.
त्याच्या मानसिकतेवर व एकूणच जीवनावर त्याचा परिणाम होतो.
हे शोधून काढण्यासाठी विशेष कौशल्याची व
अनुभवाची गरज असते. मुलाला तपासून, त्याची
पालकांशी व शिक्षकांशी बोलून, काही
विशेष चाचण्या करून या आजाराचे निदान केले जाते. याचे निदान झाल्यास मुलांना
विविध प्रकारे मदत मिळते. जसे की परिक्षेमध्ये जास्त वेळ मिळणे, त्याला writer ची मुभा मिळणे, एखाद्या विषयात सुट मिळणे इत्यादी. ही
मुले काही क्षेत्रात चांगली सक्षम असू शकतात.
काही
मुले पाहून अधिक चांगले अध्ययन करू शकतात. काही ऐकून चांगले अध्ययन करू शकतात
तर काही अनुभवातून. अध्ययनाचे विविध व
वेगळे पर्याय (आॕडिओ क्लीप, विडिओ, चार्टस्, चर्चा-वादविवाद, प्रकल्प) वापरून त्यांना शिकणे सोपे होऊ शकते.
1. अभ्यासातल्या कमी गुणांसाठी मुलांना दोष
देऊ नका.
2. मुलाची तपासणी करून घ्या. गरजेप्रमाणे
त्यांचे प्रमाणपत्र घ्या.
3. रेमेडिअल एज्युकेशन या पद्धतीचे शिक्षण
शक्य असेल तर त्यांना द्या. या शिक्षणपध्दतीमुळे मुलांना समजायला बरीच मदत होते.
मुलांना शालेय शिक्षण पूर्ण करता येते व ते चांगली कामगिरीही करू शकतात.
4. अशी मुले नैराश्यामध्ये असण्याची शक्यता
असू शकते. असे जाणवल्यास तपासणी करून घ्या व गरजेनुसार औषधोपचार किंवा समुपदेशन
घ्या.
5.
त्यांना विषयात सुट मिळण्यासाठी, मुल्यमापनामध्ये
किंवा वेळेत सुट मिळावी याकरिता शिक्षक व शालेय व्यवस्थापनाची मदत घ्या.
6.
गृहपाठ किंवा असाइनमेंट छोट्या छोट्या भागात द्यायला हव्यात. सूचना देतानाही
शांतपणे, व्यवस्थित व छोट्या छोट्या भागांमध्ये
द्यावी. त्यांना त्या सूचना समजल्या आहेत याची खात्री करून घ्यावी.
MBBS, DPM, MD(AM)
मनोविकारतज्ञ, लैंगिकसमस्यातज्ञ व व्यसनमुक्तीतज्ञ
माईंडकेअर हॉस्पिटल फॉर मेंटल अँड सेक्शुअल हेल्थ
9503421124
#mentalillness, #mentalhealth, #dratuldhage, #psychiatrist, #sexologist, #sexualproblems, #deaddiction, #mindcare, #letstalkaboutsex, #sexualproblems
Comments