ऑपरेशन कंट्रोल
ऑपरेशन कंट्रोल
काल एक रुग्ण माझ्या रुग्णालयात
अॅडमिट झाला. आपल्याला कोणी ब्लॅकमेल करत
आहे. आपल्याला कोणी मारणार आहे. कॅमेरे लावून लक्ष ठेवले आहे मोबाईल हॅक केला आहे
अशा संशय त्याला वाटत होता. त्या व्यक्तीचे कानामध्ये आवाज येताहेत असे भास होत
होते. त्यामुळे त्या भितीने तो रात्रभर झोपलेला नव्हता आणि आक्रमक होत होता. त्याच्या नातेवाईकांनी ती परिस्थिती ओळखुन त्याला लगेचच माझ्याकडे घेऊन
आले. आजाराचे सीरियसनेस लक्षात घेता मी त्याला अॅडमिट करून घेतले. दुपारी रुग्ण
व्यवस्थित जेवला, इंजेक्शन घेतले, औषधे
घेतली परंतु जशी संध्याकाळ झाली तसा मात्र तो कावरा बावरा व्हायला लागला. त्याला
परत भीती वाटायला लागली होती. तो गोळ्या घ्यायला तयार नव्हता आणि इंजेक्शनही
घ्यायला तयार नव्हता. ज्यावेळी त्याला सांगायचा प्रयत्न केला. तेव्हा मात्र तो
पळून जायला लागला आणि म्हणायला लागला “डॉक्टरपण त्यांच्यात मिसळलेले आहेत. मला
कुठे आणले आहे. ते आपल्याला औषधे देतील, इंजेक्शन देतील आणि आपल्याला मारून टाकतील”.
अशी भिती त्यांच्या मनात वाटायला लागली. थोड्या वेळाने मात्र तो पळून जायचा
प्रयत्न करायला लागला.
अशा वेळी रुग्णाला औषध देऊन किंवा
फोर्सफुली कंट्रोल करणे हे खुप गरजेचे आहे. अन्यथा तो रुग्ण कुठेतरी जाऊन आत्महत्या
करण्याचे किंवा तोडफोड, मारामारी करण्याची
शक्यता जास्त असते. त्यामुळे त्याला आम्ही कंट्रोल करण्याचा प्रयत्न करू लागलो.
समजवुन ही तो औषधे घ्यायला, इंजेक्शन घ्यायला तयार होत नव्हता. आणि तो तसा बोलायला
लागला. त्याच्या सोबत फक्त एकच नातेवाईक उपलब्ध होता. मी आणि माझा कर्मचारी व एक सिस्टर.
त्यात त्या सिस्टर ही काही करू शकणार नव्हत्या. आम्ही त्याला धरून ठेवायचा प्रयत्न
करत होतो. परंतु तो धावायला लागला, मारायला लागला आणि अशा
वेळी मग दुसऱ्या समोरच्या दोघा- तिघांच्या नातेवाईकांना बोलवून त्याला थोडा वेळ कंट्रोल करण्यासाठी बांधुन ठेवावे लागले. झोपेची
इंजेक्शन दयावे लागले. आमच्यामध्ये एमर्जन्सि साठीचे सेरेनेज फेणारगण इंजेक्शन
असते ते दयावे लागले. एवढे करून ही पेंशन्ट कंट्रोल होत नव्हता. हे जवळपास तास दोन तास चालले
त्यानंतर मग मात्र हळूहळू पेशंट थोडासा शांत झाला. औषधाचा अंमल सुरवात झाला तरीही
तो बडबड करत होता. ओरडत होता परत त्याला औषधे द्यावी लागली. रात्री 9:30ला मी
हॉस्पिटल मधुन मी निघणार होतो. घरी यायला 11 वाजले.
आमच्यासाठी हे काही नवीन नव्हत. बऱ्याचवेळी असे रुग्ण अचानक आक्रमक होतात मारामारी करायला लागतात. ओरडायला लागतात. त्यांना कंट्रोल करण्यासाठी आमची तारेवरची कसरत होती. असे करताना यापूर्वी ही कित्येक वेळा रुग्ण चावला आहे, त्याने मारले आहे. दोन वेळा चष्मा ही फुटला आहे परंतु त्यावेळची सिरिअसनेस जाणून घेता त्याला कंट्रोल करणे हे कदाचित आमच्यासाठी जास्त महत्वाच असत. रुग्ण मुद्दाम करत नाही. जाणून बुजून करत नाही याची जाणीव असते आणि त्याला या क्षणी कंट्रोल करण्याची खूप गरज असते अन्यथा तो स्वताला किंवा इतरांना धोका पोहचवू शकतो. काही वेळा स्वतःच्या स्वतावरही बेतू शकते. पण तरीही ते करणे गरचेचे असते.
-जेवण करत असताना तो प्रसंग आठवला. सायन हॉस्पिटलला त्या दिवशी माझी
एमर्जन्सि ड्यूटि होती. सर्व वार्डचे राउंड घेऊन,
सर्व पेशंट झोपले आहेत ना, त्रास देत नाहीत ना हे बघुन मी १० वाजता जेवायला गेलो.
जेवण चालू केले तेवढ्यात एमर्जन्सि रूम मधुन फोन आला. पेंशन्ट आला आहे आणि त्याला
सायकीयाट्रिक रेफरन्सची गरज आहे. कसे तरी जेवण उरकून मी व माझा सिनीयर तो पेशंट
पाहायला गेलो. पेशंट बऱ्यापैकी आक्रमक होता. चिडचिड करत होता, राग करत होता. ज्यावेळी त्याची माहिती घेण्यासाठी त्याच्याशी बोलायचा
प्रयत्न केला त्यावेळी तो अचानक अजून आक्रमक व्हायला लागला व मोठ्या आवाजात ओरडू
लागला. तेथील सगळे लोक त्याच्याकडे बघत होते. एमर्जन्सि रूम मधील कर्मचाऱ्यांना या
गोष्टीची जास्त सवय नसते. त्यामुळे कोणीही मदतीला यायला तयार नव्हते.
तेवढ्यात रुग्णाने त्या रूम मधून कात्री
घेतली व स्वताला इजा केली. त्याच्या हातातून रक्त वाहत होते. तो कंट्रोल होत
नव्हता. आणि हातातच कात्री ठेवल्यामुळे जवळ जायला ही भीती वाटतं होती. सायकॅट्री
वॉर्ड मधील मामाला मदतीला बोलवले कारण त्यांना या गोष्टीची बऱ्यापैकी सवय असते.
अशा पेशंटना हॅन्डल करायची सवय झालेली असते. ते मामा आले. मामा व आम्ही दोघे.
रुग्णाचे नातेवाईक वयस्कर होते त्यामुळे काही करू शकले नसते. सर्व प्रथम त्याने
स्वतःला इजा करून घेऊ नये किंवा इतरांना इजा करू नये म्हणून मागून जाऊन मामाने
त्याच्या हातातून कात्री काढली व नंतर त्याला फोर्सफुली बेड वरती झोपवण्याचा
प्रयत्न केला. डायझेपामचे (झोपेचे) इंजेक्शन शिरेतून दिले. परंतु तरीही रुग्ण शांत
व्हायला तयार नव्हता. त्यादरम्यान शिकाऊ सिस्टरनां जखमेवर बॅंडेज करायला सांगितले.
दोन इंजेक्शन दिले. दोन इंजेकशन देऊन ही रुग्ण रिस्पॉन्स देत नव्हता. शांत होत
नव्हता. जवळपास पहाटेच्या ३-४ वाजेपर्यंत गोंधळ चालू होता. त्यानंतर तो शांत झाला.
त्याची शारिरीक तपासणी केली. त्यांनतर असे वाटले की त्याचे सीटी स्कॅन करून घेणे
गरजेचे आहे. म्हणून त्याला परत सीटी स्कॅन करायला घेऊन गेलोत. त्यादरम्यान तो जागा
झाला. तिथेही तोच गोंधळ. सुदैवाने कसा तरी सीटी स्कॅन केला आणि त्यात काही दोष
आढळून आला नाही. जवळपास हे सर्व करण्यात पहाटेचे ७ वाजले होते. रात्रीचे १० ते
सकाळचे ७ असे ९ तास पेशंटच्या मागे झटत होतोत. सुदैवाने त्या दरम्यान दुसरा सीरियस
पेशंट आला नाही.
सर्जन ऑपरेशन थिएटर मध्ये ऑपरेशन
करतात. त्याचं ऑपरेशन तीन चार तास किंवा काही ६ ते ८ तास चालतात. परंतु आमचे
ऑपरेशन हे असे असते ज्यामध्ये पेशंटला कंट्रोल करणे आमचे काम असते. काही वेळा हे
ऑपरेशन एक-एक तास चालते किंवा दिवसभर चालते. फरक फक्त एवढाच असतो, कीं सर्जन चा पेशंट शांत पणे ऑपरेशन टेबलवर शांत झोपून सहकार्य करतो किंवा
त्याला भुल देऊन ऑपरेशन केले जाते. इथे आमचा पेशंट मात्र आमच्या जीवावर उठलेला
असतो किंवा कधी काय करेल याचा भरोसा नसतो. असे असते आम्हा मनोविकारतज्ञाचे ‘ऑपरेशन
कंट्रोल’.
डॉ अतुल ढगे
MBBS, DPM,
MD(AM)
मनोविकारतज्ञ, लैंगिकसमस्यातज्ञ व व्यसनमुक्तीतज्ञ
माईंडकेअर हॉस्पिटल फॉर मेंटल अँड सेक्शुअल हेल्थ
9503421124
#mentalillness, #mentalhealth, #dratuldhage, #psychiatrist, #sexologist, #sexualproblems, #deaddiction, #mindcare, #letstalkaboutsex, #sexualproblems
Comments