पहला नशा

 पहला नशा       

डॉ अतुल ढगे, माईंड केअर हॉस्पिटल, रत्नागिरी

   "सुरुवातीला मित्रांच्या आग्रहाखातर कशी असते पहावी म्हणून घेतली. त्यावेळी चांगले वाटले. म्हणून मग नंतर पार्टी म्हणून कधीतरी सहा महिन्यातून एकदा घ्यायला लागलो. आणि नंतर मात्र दारू घेण्यासाठी पार्ट्यांच्या बहाना होऊन महिन्याला दोन-तीन वेळा तरी घेतली जायची.  आता मात्र ती घेतल्याशिवाय चैन पडत नाही आणि घेण्यासाठी बहाना पण लागत नाही. सुरुवातीला मी दारू पित होतो, आता मात्र दारूने मला गिळून टाकले आहे" हताश होत अजित सांगत होता.

     अजित 25 वर्षाचा होता. अभ्यासामध्ये हुशार असल्याने 12 वी मध्ये चांगले मार्क मिळाल्याने इंजीनीरिंगला अॅडमिशन ही मिळाले. घरी वडीलाच्या कडक शिस्तीच्या धाकात राहिलेल्या अजितला कॉलेजला गेल्यावर तिथले स्वातंत्र्य चांगलेच वाटत होते. सेकंड यीअरला गेल्यावर मित्राच्या सांगण्यावरून व कुतुहलातून त्याने पहिल्या वेळी घेतली. त्याला तो अनुभव खूप चांगला वाटला. जास्त न बोलणारा अजित खुलून बोलायला लागला होता. त्याने मस्त डान्स ही केला. त्याला हा अनुभव चांगला वाटला. व तो मध्ये मध्ये मित्रांसोबत घ्यायला लागला. लवकरच त्याचे इंजीनीरिंग पूर्ण झाले आणि त्याला कॅम्पस प्लेसमेंट मधून जॉब पण लागला. त्यामुळे लवकरच त्याच्या हातात पैसापण यायला लागला होता. जॉब करताना कामाचा तणाव नि घरी आल्यावर एकटेपण यातून मात्र त्याचे रूपांतर व्यसनात झाले. आता मात्र त्याला सोडायची इच्छा असूनही सोडल्यानंतर त्रास होत असल्यामुळे त्याला सोडता येत नव्हती म्हणून तो उपचारासाठी आला होता. सर्व माहिती घेऊन त्याच्यावरती उपचार चालू केले. मध्ये दोन वेळ स्लीप होऊन दारू घेतली तरी त्यानंतर त्याची चिकाटी व त्याच्या कुटुंबियाच्या योग्य सहकार्यामुळे व आधारामुळे व उपचाराच्या मदतीने त्याची दारू थांबवण्यात यश आले होते. 

     दारूच्या व्यसनासाठी किंबहुना कुठलेही व्यसन सोडवण्यासाठी उपचारांसाठी माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांची किंवा व्यक्तीची थोड्याफार फरकाने अशीच स्टोरी असते. सुरुवात कधीतरी अशीच मित्राच्या आग्रहामुळे किंवा दबावाला बळी पडून किंवा कुतुहल म्हणून ती घेतल्यावर काय होते?, कसे वाटते? किंवा कधी कधी एखाद्या तणावाला किंवा मानसिक आघाताला सामोरे जाताना किंवा कधी पार्टीमध्ये मित्रांच्या सांगण्यावरून पहिल्यावेळी नशा केली जाते. दारू किंवा नशेचे पदार्थच असे असतात की सुरुवातीला ते घेतल्यावर खूप चांगले वाटते. त्याचा मेंदूवर होणारा परिणाम, मेंदूत होणारा बदल एक वेगळा व विशिष्ट अनुभव देत असतो. ताण-तणावातून जाणाऱ्याला किंवा मानसिक आघातातून जाणाऱ्यांना तात्पुरत्या वेळेसाठी बरे वाटते. काही जणांना तो येणारा अनुभव थोड्या वेळेसाठी high किंवा kick देऊन जातो. परंतु हा परिणाम तात्पुरताच असतो. ६ ते ८ तासात तो परिणाम निघून जातो. मग मात्र तो परिणाम परत परत अनुभवण्यासाठी ती व्यक्ती परत परत त्या पदार्थाचे किंवा दारूचे सेवन करते. मी यातच मग मेंदू व शरीरात असे बदल होतात की मग त्याचे शरीर किंवा मेंदू सतत दारूची किंवा त्या पदार्थाची डिमांड करते व ते शरीरास नाही भेटल्यास   विथड्रावलची लक्षणे दिसायला लागतात आणि त्या व्यक्तीला तो त्रास कमी करण्यासाठी ते घेतल्याशिवाय गत्यंतर राहत नाही. हे आजाराचे व्यसन कोणाला नि कधी लागेल सांगता येत नाही. त्यामुळे पहिला नशा हा केंव्हाही टाळलेलाच बरा.

डॉ अतुल ढगे
MBBS, DPM, MD(AM)
मनोविकारतज्ञ, लैंगिकसमस्यातज्ञ व व्यसनमुक्तीतज्ञ
माईंडकेअर हॉस्पिटल फॉर मेंटल अँड सेक्शुअल हेल्थ

9503421124 
#mentalillness, #mentalhealth, #dratuldhage, #psychiatrist, #sexologist, #sexualproblems, #deaddiction, #mindcare, #letstalkaboutsex, #sexualproblems



 

Comments

Popular posts from this blog

जागतिक स्किझोफ्रेनिया (छिन्नमनस्कता) दिवस

युद्धजन्य परिस्थिती आणि मानसिक आरोग्य - डॉ अतुल ढगे, मानसोपचारतज्ञ व लैंगिकसमस्यातज्ञ

Celebrating National Orgasm Day 2024: Understanding the Importance of Sexual Wellness