मला वेड लागलय काय ?
मला वेड लागलय काय ?
डॉ अतुल ढगे, माईंड केअर हॉस्पिटल, रत्नागिरी
“अरे वेडा झालास काय? मला काय वेड लागलय का ? मला सायकीयाट्रीस्ट कडे जायची काय गरज आहे?” माझा
मित्र मला म्हणाला.
तीन चार वर्षाची गोष्ट. सुधीर (नाव
बदललेले), वय 36 वर्षे सॉफ्टवेअर इंजीनियर
म्हणून एका कंपनीमध्ये कामाला होता. मागील २-३ वर्षे त्याला कामाचा बराच तणाव
जाणवत होता. अगोदर हाती घेतलेले काम किंवा प्रोजेक्ट तो झोकून देऊन करत असे. मागील
६-८ महिन्यापासून मात्र त्याला कामामध्ये इंटरेस्ट वाटत नव्हता. सकाळ झाली की
बेडवरून उठायचीही त्याला इच्छा होत नसे. झोप लागत नव्हती. भूक पण लागत नव्हती
क्रिकेट पाहणे, Movie पाहणे हा त्याचा आवडीचा छंद पण ते पण
करण्याची त्याची इच्छा होत नव्हती. असाच एक दिवस फोन करून त्याने मला सांगितले. मी
त्याच्याशी सविस्तर बोललो. मला तो फक्त स्ट्रेस / ताण -तणाव
नसून डिप्रेशन चा आजार असल्याचे जाणवत होते. त्यावेळी ऑनलाइन कन्सल्टेशन किंवा
ऑनलाइन प्रिस्क्रिप्शन देण्याची सोय नव्हती म्हणून मी त्याला सांगितले की त्याला मेजर
डिप्रेसिव डिसऑर्डर / नैराश्याचा आजार असल्यासारखा वाटतो
आहे. नक्की निदान करण्यासाठी व औषधाचे प्रिस्क्रिप्शन देण्यासाठी जवळच्या सायकीयाट्रीस्टचा नंबर देतो
त्याला दाखवून घे, ते गोळ्या लिहून देतील.
त्यावर त्याने हे उत्तर दिले.
"अरे वेडा झालास काय? मला वेड लागले आहे
काय ?' मला सायकीयाट्रीस्टकडे
जायची काय गरज आहे. आणि गोळ्या कशाला? एखाद्या काऊंसेलर चा
नंबर असेल तर दे किंवा स्ट्रेस मॅनेज कसा करायचा त्यासाठी काही टिप्स सांग. मी
त्याला काऊंसेलर चा ही नंबर सांगितला व काही स्ट्रेस मॅनेजमेंट च्या काही बेसिक गोष्टी सांगितल्या व कधी वाटले
तर सायकीयाट्रीस्टकडे जा म्हणून त्याच्या
जवळच्या सायकीयाट्रीस्टचा नंबर दिला.
जर शिकलेल्या सुशिक्षित लोकांची ही
अवस्था असेल तर मग अशिक्षित लोकांची काय अवस्था असेल. अर्थातच यात त्याचीही चूक
नाहिये. गैरसमज, सामाजिक कलंक अज्ञान या गोष्टी
यासाठी जबाबदार आहेत. मानसिक आजार म्हणजे वेडसरपणा, मनोविकारतज्ञ
म्हणजे वेड्यांचे डॉक्टर हे खूप प्रचंडपणे मनावर बिंबवले गेलेले आहे. जर कधी
मनोविकार तज्ञाला दाखवण्याचा सल्ला डॉक्टरांनी किंवा इतर कोणी दिला तर मे किंवा तो
काय वेडा आहे का म्हणत दुर्लक्ष केले जाते. काळजी पोटी उपचार करायची इच्छा असूनही,
वेड्यांच्या डॉक्टरला दाखवल्यास लोक काय म्हणतील? लग्न ठरायला प्रॉब्लेम येतील; म्हणून दुर्लक्ष केले जाते. उलट
अंगारे, धुपारे आशा
गोष्टी करणेसाठी गुरवाकडे घेऊन जातात किंवा मग शैतान उतरवण्यासाठी ताबीज दिले जाते
किंवा मग होली वॉटर प्यायला दिले जाते. अर्थातच या गोष्टीनी फायदा होतच नाही. इतर
सर्व डॉक्टर करून झाल्यावर मग शेवटचा पर्याय म्हणून मनोविकार तज्ञाकडे (त्यांच्या
समजुती प्रमाणे वेड्यांच्या डॉक्टरकडे) दाखवले जाते तर काही वेळा रुग्णाला उपचार न
भेटता रुग्ण आत्महत्येणे जीव पण गमवून बसतो. आणी आजार होता हे समजून घेण्याएवजी
मूल तणावाच्या कारणावर खापर फोडले जाते. आज या अज्ञान, गैरसमज,
अंधश्रद्धा सामाजिक कलंक या मुळे कित्येक मानसिक आजारी लोकांना
कित्येक दिवस त्रास सहन करावा लागतो किंवा रुग्ण स्वताच तो सहन करतो.
प्रत्येक मानसिक आजार हा वेडसरपणा
नसतो. वेडसर पणाचा आजार हा फक्त १०% भाग
असतो ज्याला सायकोसिस म्हटले जाते. त्या व्यतिरीक्त नैराश्याचा आजार, काळजीचा आजार, भीतीचे झटके, लहान
मुलांमधील शैक्षणिक समस्या व वागण्यातील समस्या, डोकेदुखी,
विस्मरण, झोपेचे व खाण्याचे आजार, लैंगिक समस्या असे कितीतरी तरी मानसिक आजार या इतर ९०% प्रकारात येतात जे
वेडसरपणाचा प्रकार नाही. तरीही फक्त या
गैरसमजापोटी अनेक जण मानसिक आजारासाठी उपचार घेणे टाळतात. मनोविकारतज्ञाकडे दाखवले
तर लोक काय म्हणतील या विचारामुळे उपचार न घेता त्रास सहन करत राहतात. अर्थातच
वेळेत उपचार न घेतल्याने त्रास तर वाढतोच त्यासोबत आजार वाढल्यामुळे ट्रीटमेंट
जास्त दिवस लागते तर काही वेळा हे आजार कायमस्वरूपीही होतात.
मानसिक आजार हे भावना, विचार, वर्तन आणि बोलणे यात होणाऱ्या बदलांचा आजार
आहे ज्याचा त्या व्यक्तीच्या वैयक्तिक,
सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक
व्यवहारिक व नातेसंबंध यापैकी एका किंवा सर्व गोष्टीवरती परिणाम होतो. बऱ्याच वेळी
तो फरक त्याच्या आसपासच्या लोकांना, नेहमी सानिध्यातल्या
लोकाना दिसून येतो. बऱ्याच वेळी त्याचे वागणे, बोलणे,
विचार करण्याची पद्धत विचित्र असेल तर ते लगेच लक्षात येते. हा बदल
एकदम होऊ शकतो किंवा हळूहळू ही होऊ शकतो. थोडकयात हा मनाचा आजार आहे मनाशी निगडीत
गोष्टीमध्ये या मूळे समस्या निर्माण होतात व त्याचा रुग्णाला व नंतर नंतर सर्वांनाच
त्रास होऊ शकतो.
जसे शरीर आजारी पडते तसे मनही आजारी पडते हे लोक
अजूनही समजून घ्यायचा प्रयत्न करत नाहीत. शरीराचे आजार असतील तर आपण लगेच उपचार
घेतो परंतु काही मानसिक आजार असेल तर मात्र आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. साधा ताप
सर्दी असेल तरी आपण लगेच डॉक्टरांकडे जातो परंतु मानसिक त्रास टोकाचा होईपर्यंत
सहसा कोणी डॉक्टरांकडे जात नाही. घरी कोणी
शारिरीक दृष्ट्या आजारी असेल तर लगेच त्याला डॉक्टरांकडे घेऊन जातो परंतु कोणी
मानसिक ताण-तणावात असेल तर त्याच्याशी बोलायलाही वेळ नसतो. त्यात त्याला कितीही
त्रास होत असेल, ती व्यक्ति आत्महत्ये च्या विचारापर्यंत जात असेल तरीही आपण
त्याला योग कर, प्राणायाम कर, मन रमवायचा प्रयत्न कर असे टेंशन नको घेऊ सल्ले देऊन
मोकळे होतो. मुळातच पेशंटला स्वतलाही हे वाटत असते, समजत असते किंबहुना त्याने तो
प्रयत्नही केलेला असतो, परंतु हे मानसिक आजार असल्यामुळे त्यांना ते शक्य होत नसते
हे समजून घेणे खूप गरजेचे असते. शारिरीक आजारासाठी औषधोपचार केल्यानंतर जस आजार
कमी होतो तसंच मानसिक आजारचे औषधोपचार केल्यानंतर हा त्रास कमी होतो. डायबेटीस /
बी.पी. असे आजार असतील तर आपण त्यात मोठेपणा मिरवतो मला एवढया वर्षापासून त्रास
आहे, मी या डॉक्टरांकडून उपचार घेतो वगैरे. मानसिक आजार बाबत अर्थातच हे
एक्सपेक्टेड नाही परंतु कमीत कमी लवकरात लवकर उपचार घेऊन त्रास कमी करता येऊ शकतो
हे लक्षात घेतले तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला किंवा आपल्या घरच्यानां होईल ही
अपेक्षा.
डॉ अतुल ढगे
MBBS, DPM,
MD(AM)
*मनोविकारतज्ञ, लैंगिकसमस्यातज्ञ व व्यसनमुक्तीतज्ञ*
*माईंडकेअर हॉस्पिटल फॉर मेंटल अँड
सेक्शुअल हेल्थ*
9503421124
#mentalillness,
#mentalhealth, #dratuldhage, #psychiatrist, #sexologist, #sexualproblems,
#deaddiction, #mindcare, #letstalkaboutsex, #sexualproblems,

Comments