माय नेम इज खान

 माय नेम इज खान’

 डॉ अतुल ढगे, माईंड केअर हॉस्पिटल, रत्नागिरी




     "क्या करे डॉक्टर साब, कुछ समज में नहीं आ रहा है. सामने कुछ दिख नही रहा है!" शाहरुखची आई आपल्या डोळ्यातील पाणी पुसत म्हणाल्या .

    शाहरुख (नाव बदललेले) 6 वर्षाचा होता. दीड दोन वर्षांचा होईपर्यंत त्याची वाढ व्यवस्थित होत होती. त्यानंतर मात्र त्याच्यामध्ये त्याच्या पालकांना बदल वाटायला लागला. त्याला बोलायला उशीर होतोय किंवा त्याच्या वयाप्रमाणे त्याला बोलायला जमत नाहीये असे त्यांना दिसायला लागले. शाहरुख तीच ती वाक्ये पुन्हा बोलायचा. तो इतरांशी जास्त बोलत नसे. इतर मुलांमध्ये तो मिसळत नसे. एकटाच खेळत बसे. खेळतानाही तो फक्त गाड्यांशीच खेळत असे. मामा मावशी, काका, आत्या किंवा इतर कोणीही आले, त्याच्याशी बोलले, त्याला कडेवर घेतले, खेळवले तरी तो हसत नसे. त्याला आनंद होत नसे.

    त्याला ऑटिजम असल्याचे माझ्या लक्षात येत होते. "तो सतत एखादी काही हालचाल करत असतो काजसे की, डुलत राहणे, हलत राहणे, डोके हलवणे इत्यादी." मी त्यांना विचारले. "हो, काहीवेळा तो विनाकारण स्वतःभोवती फिरतो. तर बऱ्याच वेळा बसल्या ठिकाणी तो डुलत राहतो."त्याच्या आईने सांगितले. "कधी चिडचिड करतो का? स्वतःला मारतो का? चावतो का? भिंतीवर डोके आपटतो का?" मी विचारले. कारण अशा मुलांमध्ये स्वतःला किंवा इतरांना इजा करणे अशा गोष्टी होण्याची शक्यता राहते. "नाही. तसा तो काही करत नाही. परंतु त्याला सर्व जागच्या जागी लागते. त्याच्या वस्तूंच्या जागा बदलल्या किंवा त्याच्या दैनंदिन रूटीनमध्ये काही बदल झाला की मग मात्र तो चिडचिड करतो. "या अगोदर कुठे दाखवले आहे का? काही तपासण्या केल्या आहेत का? ऑटिजम असल्यासारखे वाटते आहे." मी त्यांना विचारले. मोठी फाईल समोर करत त्याची आई म्हणाली, "कल्याण में भी दो डॉक्टर को दिखाए लेकिन कुछ फरक नहीं हो रहा है. आपके बारे में बहुत सुना था इसलिए आपके पास में लेके आए."

     "क्या करे डॉक्टर साब, कुछ समज में नहीं आ रहा है. सामने कुछ दिख नही रहा है!" शाहरुखची आई आपल्या डोळ्यातील पाणी पुसत म्हणाल्या.   "एक आयुर्वेदीक डॉक्टर बोले की, दवाईयाँ हररोज दे दो, उसके दिमाग का डेवलपमेंट होगा. देढ साल दवाई दिया लेकिन कुछ फरक नही पड रहा है!"

    ऑटिजम असलेल्या मुलांच्या बऱ्याच पालकांमध्ये अशी हतबलता येते. जवळपास दर 2000 मुलांच्या मागे 1 मुलाला ऑटिजम समस्या असते. ऑटिजम अशी समस्या आहे ज्यामध्ये मुलांना समाजात मिसळण्यात, बोलण्यात किंवा भाषा व बोलणे शिकण्यात समस्या येतात. ते त्यांना जमत नाही. हा आजार मुख्यतः मुलींच्या तुलनेत  मुलांमध्ये चारपट जास्त प्रमाणात दिसून येतो. मेंदूच्या वाढीच्या समस्येचा हा आजार असला तरी तो नेमका कशामुळे होतो हे अजून समजलेले नाही.

    ऑटिजमवर सध्यातरी तसा काही उपाय नाही की ज्यामुळे ते मुल त्यातून बाहेर पडू शकेल. परंतु लवकरात लवकर निदान करून त्याला Early intervention therapy मध्ये occupational थेरपी, वर्तनविषयक किंवा शैक्षणिक दृष्ट्या उपचारपद्धती अवलंबल्या तर त्यांच्यामध्ये थोडीफार समाधानकारक प्रगती होऊ शकते. त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहायला मदत होऊ शकते. तसेच यातील काही मुलांमध्ये एखाद्या ठराविक गोष्टीत प्राविण्य असते ते ओळखले व त्यात त्याला मदत केली तर त्याचा फायदा त्याला होऊ शकतो.

    एव्हाणा मी या मुलाला शाहरुख हे नाव का दिले असेल हे लक्षात आले असेल आणि तुम्ही ‘माय नेम इज खान’ हा मुव्ही पाहिला असल्यास त्यातला शाहरुख तुमच्या डोळ्यासमोर आला असेल ही अपेक्षा. 


डॉ अतुल ढगे
MBBS, DPM, MD(AM)
*मनोविकारतज्ञ, लैंगिकसमस्यातज्ञ व व्यसनमुक्तीतज्ञ*
*माईंडकेअर हॉस्पिटल फॉर मेंटल अँड सेक्शुअल हेल्थ*
9503421124  

#mentalillness, #mentalhealth, #dratuldhage, #psychiatrist, #sexologist, #sexualproblems, #deaddiction, #mindcare, #letstalkaboutsex, #sexualproblems


 


Comments

Popular posts from this blog

जागतिक स्किझोफ्रेनिया (छिन्नमनस्कता) दिवस

युद्धजन्य परिस्थिती आणि मानसिक आरोग्य - डॉ अतुल ढगे, मानसोपचारतज्ञ व लैंगिकसमस्यातज्ञ

Celebrating National Orgasm Day 2024: Understanding the Importance of Sexual Wellness