शराब बला है गालिब

 

शराब बला है गालिब

डॉ अतुल ढगे, माईंड केअर हॉस्पिटल, रत्नागिरी

 

जाहिद, शराब पीने दे मस्जिद में बैठकर

या वो जगह बता, जहाँ ख़ुदा न हो

   उर्दूतील एक अजरामर शायर गालिब यांनी लिहिले आहे. यावरून ते दारुच्या किती आहारी गेले होते व सतत त्यांच्या डोक्यात दारूचा विचार असायचा हे लक्षात  येते. दारुमुळे त्यांच्या आयुष्याची झालेली वाताहत कदाचित बऱ्याचजणांना माहित असेल. पैसा, प्रसिद्धी, प्रतिभावंत असताना देखील दारूमुळे ते कधीही आयुष्यात सुखी राहू शकले नाहीत. १८६७ साली त्यांना त्यामुळे पक्षाघातही झाला व पुढे १८६९ साली त्यांचा मृत्यही झाला.

दारू अशी गोष्ट आहे जी आयुष्याच्या सर्वच भागावर परिणाम करते.

   व्यसनांमुळे मुळे आर्थिक स्थैर्य हरवते. दिवसाकाठी व्यसनासाठी ३-४ हजार रुपये खर्च करणाऱ्या व्यक्ती मी पाहिल्या आहेत. व्यसनांवरती खर्च, त्यामुळे होणाऱ्या आजारावर खर्च, कामावर / व्यवसायावर होणाऱ्या परिणामामुळे होणारे  आर्थिक नुकसान, दारूच्या नशेत हरवणारे पैसे  किंवा फसवणूक यामुळे खूप मोठे आर्थिक नुकसान होत असते. जे आर्थिक विवंचना आहेत, समस्या आहेत म्हणून व्यसन करतात त्यांच्यासाठी तर हे खूपच महत्त्वाचे आहे. अर्थात काहीजणाची आर्थिक परिस्थिती खूप चांगली असेलही परंतु शक्यतो या सर्वांचा शेवट कामावरून काढून  टाकले जाणे किंवा व्यवसायाचा ऱ्हास व आर्थिक दिवाळखोरी असाच होतो.

   व्यसनाचा मानसिकतेवरती खूप मोठा परिणाम होत असतो. वाढणारी चिडचिड, निर्णय घेण्यात येणारी अक्षमता, त्यामुळे कामाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्या व घरात होणारे वाद यामुळे होणारा मानसिक त्रास यासोबतच व्यसनामुळे होणारे मानसिक आजार उदा. नैराश्येचा आजार, काळजीचा आजार, भितीचे आजार, वेडसरपणा,विस्मृती इत्यादी मानसिक आजार खूप त्रासदायक ठरु शकतात.

   त्यामुळे नातेसंबधावरही परिणाम होतात. दूरचे नातेवाईक तर दूरावतातच पण जवळचे नातेवाईकही याला सांगून काही उपयोग नाही असे नाराज होऊन फारकत घेतात. लहाणपणी मुले घाबरून दूर राहतात तर जशी मुले मोठी होतात, त्यांना समजायला लागत तसे तेही तिरस्कार करायला लागतात. पत्नीला होणाऱ्या त्रासामुळे, नाराजीमुळे पती पत्नीतला दुरावा वाढत जातो. प्रत्येकाची पत्नी गालिबच्या पत्नीसारखीच प्रेम करणारी, सहन करणारी समजूतदार असेल असे नाही बऱ्याच वेळी ती सोडून माहेरी जाते किंवा आपला वेगळा संसारही थाटते.

   दारुचा नखापासून ते केसापर्यंत  शरिराच्या सर्व अवयवावर परिणाम होऊन शारिरीक आरोग्याचे नुकसान होते. छोटया मोठ्या आजारासोबतच कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात. उच्चरक्तदाब, हृदयविकार अशा आजारांची शक्यता वाढून त्यात मृत्युही होऊ शकतो. यकृतासारखा महत्वाचा अवयव निकामी झाल्यास शेवटची दोन वर्षे पोटातील पाणी काढण्यास हॉस्पीटलची वारी करण्यात व अंथरुणात खिळून राहूनच जातात. समाजात अशा लोकांना एकच नाव आहे - "दारुडा". समाजात त्या व्यक्तीचे नाव तर खराब होतेच परंतु समाजात राहताना त्याच्या कुंटुबीयांना देखील विविध समस्यांचा सामना करावा लागतो. त्यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलतो एवढेच नाही तर आर्थिक विवंचनेतून गैरफायदा घेण्यापासून ते बळजबरी करण्यापर्यंत काही कुवृत्तीच्या लोकांची मजल जाऊ शकते.

   सुरुवातीला बऱ्याच वेळी पिणाऱ्याच्या ते लक्षात येत नाही किंवा आपण  तेवढी पिणार नाही असा (चुकीचा ?) विश्वास असतो. पुढे लक्षात आल्यावरही ते ऐवढे आहारी गेलेले असतात की ते कळूनही नाकारतात किंवा शेवटच्या टप्प्यात आता संपलेच आहे सर्व तर काय करणार म्हणून दारू चालूच ठेवतात.

त्या गालिबला व सर्व दारू पिणाऱ्यांना मला हेच सांगावेसे वाटते.

दारू बला है गालिब की छू मत उसे,

जिंदगी, खुशी, रिश्ते, तबीयत, आफियत,

क्या बर्बाद नही करेगा पुछ उसे !

 

डॉ अतुल ढगे
MBBS, DPM, MD(AM) 
मनोविकारतज्ञ, लैंगिकसमस्यातज्ञ व व्यसनमुक्तीतज्ञ
माईंडकेअर हॉस्पिटल फॉर मेंटल अँड सेक्शुअल हेल्थ
9503421124 

#mentalillness, #mentalhealth, #dratuldhage, #psychiatrist, #sexologist, #sexualproblems, #deaddiction, #mindcare, #letstalkaboutsex, #sexualproblems

 

 

 

 





Comments

Popular posts from this blog

जागतिक स्किझोफ्रेनिया (छिन्नमनस्कता) दिवस

युद्धजन्य परिस्थिती आणि मानसिक आरोग्य - डॉ अतुल ढगे, मानसोपचारतज्ञ व लैंगिकसमस्यातज्ञ

Celebrating National Orgasm Day 2024: Understanding the Importance of Sexual Wellness